Saturday, May 7, 2011

सांग सखे,

0 comments

 

सांग सखे,
आणखी किती दिवस तू मला छलनार आहेस,
स्वप्नात शिरुनि अलगद
रात्र उद्वस्त करणार आहेस,
कल्पनेच्या हिन्दोल्यावर या जिवाला झुलवनार,
पापण्यांच्या धनुरातुनी तीर तू सोडणार आहेस.
मोहाच्या श्रुन्ख्लेत गुंतवून बंदी मला करणार आहेस,

सांग सखे,
आणखी किती दिवस तू मला छलनार आहेस,
काळजातल्या प्रेमवेलीची शब्द फुले बननार आहेस.
काव्य बनुनी माझे लेखनी तुन झरनार आहेस.
होउनी गीत मज़े ओठावर रेंगाळनार आहेस.
   की बनुन दू:ख माझे अश्रु तुन ओघळनार आहेस.


सांग सखे,
आणखी किती दिवस तू मला छळनार आहेस,
कमल पुष्पात गुंतलेल्या भ्रमराच्या अंत तू पाहणार आहेस.
की आग बनुनी ह्रूदयात वणवा तू भडकवनार आहेस.
प्रेम वेडया या जिवाला वेड आणखी लावणार आहेस.
की फास बनुनी माझ्या गळयाचा जीव तू घेणार आहेस.


सांग सखे ,
आणखी किती दिवस पुन्हा पुन्हा .....
तू मला छळनार आहेस,
आयुष्यात एकदा तरी मुसळधार प्रेम् प्रजन्य ब्स्नुनी मजला ,
चिंब न्हाहू घालणार आहेस...
कि जिवंतपणी मला जाळन्या केवळ चिता तू रचणार आहेस?


 

Instant Approval, Get your money in one hourLeave a Reply