Sunday, May 22, 2011

एक दिवस

2 comments

एक दिवस

एक दिवस येईल असा,
आयुष्याला कलाटणी देणारा क्षितीजापलीकडे पाहणारा,
एक दिवस येईल असा,
सुकलेल्या नशिबाला उजाळा देणारा,
एक दिवस येईल असा,
तळपत्या उन्हात सावली देणारा,
एक दिवस येईल असा,
अंधारातही प्रकाश देणारा,
एक दिवस येईल असा,
यश्याच्या शिखरावर पाऊल टाकणारा,
एक दिवस येईल असा,
आयुष्यातील गणित सोडवणारा,
एक दिवस येईल असा,
संकटांनाही मागे फिरवणारा,
एक दिवस येईल असा,
आनंदाने डोळे ओले करणारा,
एक दिवस येईल माझा ...  


2 Responses so far

  1. Reshma says:

    wait lavakar yeil to divas

  2. sari says:

    amazing............too good.......

Leave a Reply