Wednesday, May 4, 2011

प्रेमपाखरू

0 comments


प्रेमपाखरू
हृदयाच्या वेलीवर वाढणारे माझे प्रेमपाखरू,
भावविश्वात रमणारे माझे प्रेमपाखरू,
स्वप्नांचे रंग उजळू पाहणारे जाचक बंधनातून विसावलेले माझे प्रेमपाखरू,
निर्भीडपणे उडू पाहणारे दडपणाखाली लपलेले माझे प्रेमपाखरू,
प्रेमवेलीला फुलवणाऱ्या हाकेची वाट पाहणारे माझे प्रेमपाखरू,
उगवणाऱ्या सूर्याकडे डोळेलाऊन तिची वाट पाहणारे माझे प्रेमपाखरू. 

 
Leave a Reply