Thursday, May 12, 2011

डोळे माझे

0 comments
डोळे माझे

स्वप्नांमध्ये तुला शोधणारे डोळे माझे,
मिणमिणत्या ज्योतीमध्ये तुला बघणारे डोळे माझे,
तुझ्या आठवणीने घळाघला अश्रू काढणारे डोळे माझे, 

तुझी चाहूल लागताच कावरे बावरे होणारे डोळे माझे,
तुला बघुनी प्रफुल्लीत होणारे डोळे माझे,
तुला बघता स्वत:लाही विसरणारे डोळे माझे,
का असे वागतात डोळे माझे,

शब्दही न काढता खूप काही बोलणारे डोळे माझे,
वेड लावूनी तू जाताना तुझी वाट पाहणारे डोळे माझे,
निराश झालेले मोडलेली स्वप्न गोळा करत तुला शोधणारे डोळे माझे.
       

Leave a Reply